१४ फेब २०१०, valentine day...
आस का बर होत कि आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी मिळत नाहीत आणि नको असणाऱ्या मिळतात? Girlfriend हवी, girlfriend हवी अस म्हणत engg ची ४ वर्ष रडलो पण कधीच डाळ शिजली नाही, आणि आता वेळ काळ नसताना कोणीतरी प्रचंड का बर आवडाव? त्या व्यक्ती शिवाय काहीच कस सुचू नये? बर आपण आसू १० मूर्ख पण ती देखील शतमूर्ख कशी निघावी? काहीही झाल तरी माझ्यासारख्या मुलाला हो म्हणाली म्हणजे कलियुग संपल कि काय? जगात तिच्यासारखे चांगले लोक आजूनही आहेत का? कि हा unique piece एकटाच?
असे असंख्य प्रश्न मला १४ फेब ला पडले... १४ फेब ला मी काही वेगळ केल नाही, तिला भेटलो देखील नाही, पण तरीही ती दिवसभर बरोबर असल्यासारख वाटत होत. आमचे थोर विचार म्हणजे '१४ फेब च काय कौतुक , सगळे दिवस सारखेच, प्रेमात आसलेल्या लोकांचे गुलाबी आणि प्रेमात नसलेल्या लोकांचे काळवंडलेले' .. ! पण ह्या वेळेस १४ फेब मलादेखील बेबी पिंक का वाटत होता कोणास ठावूक? तिला तो रंग फार आवडतो म्हणून असेल कदाचित. आमचे थोर विचार बाजूला ठेऊन तिला happy valentine's day wish केल्यानंतर तिला झालेला आनंद मला फोन वरून कळत होता. माझ्या colleague च्या सांगण्यानुसार ती हा दिवस खरच आयुष्भर लक्षात ठेवेल का? मी तरी नक्कीच विसरणार नाही.. :)
तिच्याशिवाय माझ आयुष्य देखील असच होत काळवंडलेले, पण आता रंगेबेरंगी दुनियेची चटक लावून ती निघून तर जाणार नाही ना याची भीती वाटत राहते. तिच्या शिवाय दुसर काहीच कळत नाही मला आज काल, डोळे बंद करा तरी तीच दिसते, उघडले तरी तीच, झोपण्याआधी तिचे विचार मनात, स्वप्नही तिचीच पडतात हल्ली , बर सकाळी जाग येते ते पण तिच्या फोन मुळेच. तिचं Good Morning खरच माझी सकाळ आनंदी करून टाकत. तिच्याशिवाय माझ कस होणार देवाला ठावूक..!!!!
ती जेव्हा ' I love U' म्हणते तेव्हा हृदयाचा ठोकाच चुकतो, प्रचंड भारी वाटत, सांगता येण्या पलीकडचे. तिला बघितलं कि हृदयाचे ठोके वाढतात, कदाचित हृदयाला पण पळत पळत तिच्या कुशीत शिरावस वाटत असेल.. :) तिचे पाणीदार डोळे बघून प्रचंड उत्साह येतो, कामाचा सगळा कंटाळाच निघून जातो. त्यात तिने काजळ लावलं असेल तर विचारायची सोयच नाही. ती म्हणते 'It's you who makes me beautiful', ती आस म्हंटल्यावर मी ' ओरे बापरे' असा तिचाच dialog तिला ऐकवतो, मस्त जुगलबंदी चालते आमची.. :) आमचे तसे भेटण्याचे योग कमीच जुळून आले आहेत, कधी मला कामं असतात तर कधी ती कामात बुडालेली असते. चालायचंच आस म्हणून आम्ही दुर्लक्ष करतो पण एकमेकांच्या मनातील दु:ख लगेच कळून येत. त्याची सगळी उणीव आम्ही मग भेटल्यावर भरून काढतो. त्यात तिचे काका मामा जीजू ताई मम्मी अश्या सगळ्यांना चुकवत भेटायचं म्हणजे पंचवार्षिक योजनाच असते.
खरच मी प्रेमात पडलो आहे का? कि आयुष्य मला आजून एक धडा शिकवते आहे? प्रेमात पडलो असेल तर माझ्या प्रेमाचे कोडे कधी सुटणार? 'TWO STATES' सारखच मी माझ्या लग्नाची स्टोरी लिहू शकेल का? असंख्य प्रश्न मनात घोळत आहेत, उत्तर कधी मिळेल माहित नाही :( त्यात post graduation च planning चालू आहे, त्यातून हे सगळ कस जमणार? जमल तरी M.S. होई पर्यंत काही होणार तर नाही ना? दूर राहून प्रेम टिकेल का?
P.S. सदरचा लेख हा सहजच मनात आल मानून लिहिला असून त्याचा कुठेही संबंध जोडू नये. मनातल्या गोष्टी कुठेतरी उतरवायच्या म्हणून इथे, बाकी काही प्रयोजन नाही. अजून लिहायला बरंच काही आहे पण सगळ एकदम नको कोणी वाचणार नाही. ;) लवकरच भेटू, माझ प्रेमप्रकरण भाग २ मधे.
Please consider the environment before printing this Post
Please consider the environment before printing this Post